महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 52 शिकाऊ उमेदवारांची होणार भरती
9 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
लातूर: (जिमाका)दि. 25 - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 2023-24 सत्रासाठी वेगवेगळ्या व्यवसायासाठी 52 शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) यांची पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांनी एनएपीएस वेब पोर्टलवरील www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर, तसेच पदवीधर, पदवीकाधारक उमेदवारांनी एनएटीएस पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर 26 जुलै 2023 ते 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून ‘एमएसआरटीसी डिव्हिजन लातूर’ या या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शिकाऊ उमेदवारांना छापील नमुन्यातील अर्ज भरण्याची 10 ऑगस्ट 2023 ते 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी तीनवाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात यांत्रिक मोटारगाडी (एमएमव्ही)- 36 जागा, विजतंत्री (इलेक्ट्रीशियन)- 7 जागा, सांधाता (वेल्डर) (गॅस अॅन्ड इलेक्ट्रीकल)- 01 जागा, मोटारगाडी साठाजोडारी (एमव्हीबीबी) (शिट मेटल वर्क्स)- 05 जागा, पेन्टर- 01 जागा, अभियांत्रिकी पदवीधर / पदवीकाधारक - 02 जागा अशा एकूण 52 शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. संबंधित व्यवसायातील उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना छापील अर्ज अंबाजोगाई रोडवरील राज्य परिवहन विभागीय कार्यालयातील आस्थापना शाखेत 10 ऑगस्ट 2023 ते 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळून उपलब्ध होतील. या अर्जाची किंमत (18% जीएसटीसह) खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 259 रुपये राहील. अर्जाच्या किंमतीचा धनादेश किंवा आयपीओ (इंडियन पोस्टल ऑर्डर) MSRTC Fund Account, Latur दिल्यानंतरच अर्ज प्राप्त करून दिले जातील.
9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, ते अर्ज रद्द समजले जातील. अशा उमेदवारांना छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही. जे उमेदवार 18 ऑगस्ट, 2023 रोजी दुपारी तीनवाजेपर्यंत कार्यालयात विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत, त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला जाणार नाही, असे राज्य परिवहन लातूर विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 Comments