नेशनल इंटीग्रेशन एक्सीलेंस अवार्ड 2023 घोषित महाराष्ट्रातून पत्रकार रविंद्रसिंघ मोदी यांची निवड
जीतेन्द्रसिंह शंटी, एथलीट जोरावरसिंह, एंकर निदा अहमद, दिव्या गोयल, रवींद्रसिंघ मोदी मानकरी
राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेले स. रवींद्रसिंह मोदी हे महाराष्ट्राच्या नांदेड शहरातून मागील तीस वर्षापासून हिंदी, मराठी आणि पंजाबी वर्तमान पत्रासाठी पत्रकारिता करीत आहेत. स. रवींद्र यांनी पत्रकारिता क्षेत्रात सतत तीस वर्षें दिलेल्या योगदानासोबत सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या समाज कार्यांची दखल घेत वरील पुरस्कार त्यांना घोषित झाले आहे. नांदेड शहरात शीख धर्मियांचा पवित्र पावन तखत सचखंड हजुरसाहिब गुरुद्वारा विद्यमान आहे. या ठिकाणाहून रवींद्रसिंह मोदी यांनी वर्ष 2008 मध्ये पार पडलेल्या गुरुतागद्दी त्रिशताब्दी सोहळा दरम्यान समाजाभिमिख आणि जागरुक पत्रकारिता केली होती. विविध दैनिकात त्यांनी जिल्हा प्रतिनिधी व उपसंपादक म्हणून कार्य केले आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनन्दन करण्यात येत आहे.
नई दिल्ली: दि. 13 जुलै येथील इंटरनेशनल इक्विटेबल ह्यूमन राइट्स सोशल कॉन्सिल नई दिल्ली संस्थेच्या विद्यमानाने सतत तिसऱ्या वर्षी देशात विविध क्षेत्रात कार्यरत आणि राष्ट्रीय सद्भावनाचे उदाहरण असणाऱ्या मान्यवरांना 'नॅशनल इंटीग्रेशन एक्सेलेंस अवार्ड्स 2023' प्रदान करून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख व वरिष्ठ मिडिया कर्मी संजय सिन्हा यांनी मीडिया आणि पत्रकारांनी दिली.पुढे माहिती देतांना संजय सिन्हा यांनी सांगितले की देशाच्या वर्तमान परिस्थिती कडे पाहता सामाजिक सौहार्द वृद्धि होऊन सलोखा निर्माण व्हावा तसेच समाज निर्माण क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून इंटरनेशनल इक्विटेबल ह्यूमन राइट्स सोशल कॉन्सिल संस्थेने पुरस्कार सुरु केले आहेत. देशपातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची निवड करून त्यांना भव्य अशा कार्यक्रमात सन्मानित करण्यात येते. हे तीसरे वर्ष असून यंदाच्या पुरस्कारासाठी मागील कोविड संक्रमण काळात योगदान देणाऱ्या विभूतींचीही प्राधान्याने निवड करण्यात आली. त्यात कोविड काळात हजारोंच्या संख्येत मृतांच्या देहाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या श्रीमान जीतेन्द्रसिंह शंटी यांच्या सह भारतीय रोप जंप एथलीट जोरावर सिंह, सीनियर न्यूज एंकर निदा अहमद, आरजे राहुल मकीन, पारा एथलीट दिव्या गोयल, योगा इंस्ट्रक्टर मॉडल श्रेया राठौर देव, ग्लोबल एजुकेटर रूपम मुखर्जी, स्पोर्ट्स पर्सन एवं स्पोर्ट्स एक्टिविस्ट बालेंद्र मोहन चक्रवर्ती, पत्रकार रवींद्रसिंघ मोदी (नांदेड़ महाराष्ट्र), समाज सेवी मुनींद्र नाथ, मधुसूदन मेदी यांना पुरस्काराने गौरविण्यात येईल.
इंटरनेशनल इक्विटेबल ह्यूमन राइट्स सोशल काउंसिल संस्था अंतर्राष्ट्रीय स्तरावर मानव अधिकार प्रति जनजागृतीचे अभियान संचालित करीत आहे. भारताच्या अनेक राज्यामध्ये संस्थेचे कार्य विस्तारित होताहेत. संस्थाचे राष्ट्रीय संयोजक आणि "प्रज्ञा मेल" वर्तमान पत्राचे संपादक अरुण बर्मन एक मोठी जवाबदारी पार पाडित आहेत. त्यांच्या पुढाकारने येत्या दि. 22 जुलै 2023 रोजी गांधी पीस फाउंडेशन, न्यू दिल्ली येथे मान्यवर अथितींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
0 Comments