आषाढी एकादशी वारी निमित्त आशीव येथील टोल नाक्यावर पोलीस आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक
बी.डी.उबाळे
औसा: तालुक्यातील आणि भादा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आशीव टोल नाका तुळजापूर रोड येथे टोल व्यवस्थापक व कर्मचारी यांची मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी औसा उपविभागीय पोलीस अधिकारी इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीमध्ये वारकऱ्यांना पथकरातून सूट देणे बाबत सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच वारकऱ्यांसोबत कोणीही बेशिस्त व गैरवर्तन करणार नाही याबाबत देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच टोलनाक्यावरून जाणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची टोल कर्मचाऱ्याकडून मानहानी होऊ नये आणि सदरील वारकऱ्यांची तीर्थयात्रा आणि पंढरपूर वारी सुकर व्हावी याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे, स पो उप नि प्रकाश शिंदे आणि इतर कर्मचारी बिट जमादार सूर्यप्रकाश गिरी, बंडू डोलारे, ठाणे आमलदार अविनाश टोपे आदी कर्मचारी या कामी सतत कार्यरत असल्याचे पोलीस ठाण्याकडून कळविले आहे.
0 Comments