छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती भादा ग्राम पंचायत कडून साजरी
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय भादा येथे अस्पृश्यता निवारण तसेच सामाजिक समतेचे पुरस्कर्ते,बहुजनांच्या प्रगतीसाठी स्वतः शिक्षण संस्था उभारण्यासाठी पुढाकार घेणारे,कला क्षेत्राला प्रोत्साहन देणारे महान समाजसुधारक बहुजन उद्धारक सच्चा लोकराजा, छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांची जयंती सोमवार दिं 26 जून 2023 रोजी भादा येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी जिल्हा परीषद सदस्य रमाकांत परमानंद पाटील यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली.
यावेळी उपसरपंच बालाजी शिंदे आणि भादेकर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने ग्राम पंचायत कार्यालय येथे उपस्थित होते.
0 Comments