Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरा

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरा


शिरूर अनंतपाळ: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हिसामाबाद उजेड येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी समता फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

समताफेरीच्या समारोपानंतर मुख्याध्यापक बालाजी जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या लोकोत्तर आणि जनकल्याणाच्या कार्याचा सविस्तर परिचय देविदास कांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजयकुमार शिंदे, जयश्री कुमदाळे, बालाजी शिंदे, महादेव बनसोडे, सचिन गुणाले, श्रीदेवी गरगटे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments