Latest News

6/recent/ticker-posts

औराद शहजानी येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल

औराद शहजानी येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल


औराद शाहजानी: येथील सीमा एकात्मकता  शैक्षणीक संस्थे अंतर्गत चालणार्या युनिव्हर्सल पब्लिक स्कूल विद्यालयातील विद्यार्थ्यानी दहावीच्या  परीक्षेत घवघवीत यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ मार्फ़त घेण्यात आलेल्या  माध्यमिक परीक्षेत एकूण ४३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी सर्व ४३ विद्यार्थी विशेष प्रविणासह उत्तीर्ण झाले आहेत. यात विद्यालयातुंन सर्व प्रथम मोरे अनिकेत अरुण ९८.२० द्वितीय पांचाळ सागर अरुण ९७.०० आणि करखेले सुफीयान फारुख व पेठकर पुजा प्रसाद ९६.६० यात ९०% हून अधिक गुण घेउन २८ विद्यार्थी उतीर्ण जाले. विज्ञान विषयात ४ , गणित विषयात ३ तर सामाजिक शास्त्र विषयात ६ विद्यार्थ्यांनी १०० गुण घेऊन यश संपादन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थयाचे संस्था अध्यक्ष सौ.राजकन्या दरक, सचीव सौ.जयश्री कुलकर्णी मुख्याध्यापक श्री. पि.व्ही.कुलकर्णी, पंकज कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी उल्हास सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, सय्यद मियासाब, आनंद चांडेश्वरी, राजेश माळी, मिलिंद कदम सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थी चे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments