Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथेल महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश

निलंगा येथेल महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश


निलंगा: शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेमध्ये महाराष्ट्र विद्यालय, निलंगा या शाळेचे एकूण 336 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती.

शाळेचा एकूण निकाल 97.61% लागला असून विशेष प्राविण्य 184, प्रथम श्रेणी 103 व्दितीय श्रेणी 38, उत्तीर्ण 03 एकूण 328 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे शाळेतून प्रथम मोरे श्रेयश शंकर 100.00% व व्दितीय कुंजटवाड ऐश्वर्या दत्तात्रय 99.60% तृतीय कुं जाधव अनुष्का आनंद 98.40% व कुं जाधव श्रध्दा बळीराम 98.00% तसेच 90.00% पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण 54 विद्यार्थी आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर साहेब, युवा नेते श्री अशोक (भैय्या) पाटील निलंगेकर साहेब, शाळेचे मुख्याद्यापक श्री पाचंगे आर. के. उपमुख्याद्यापक श्री पवार डी.डी., पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख एस. डी. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments