मोफत पंढरपूर वारीचा लातूर पॅटर्न कायम;लातूरच्या ग्रामीण भागातील १५१ भाविकांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन
गतवर्षी आषाढी एकादशी निमित्त माझं लातूर परिवाराच्या ऐतिहासिक मोफत पंढरपूर वारी उपक्रमात रुद्राक्ष ट्रॅव्हल्सने ४ प्रवासी वाहतूक बस उपलब्ध करून महत्वपूर्ण योगदान दिले होते.
आषाढी एकादशी निमित्त आयोजीत या उपक्रमात १५१ भाविकांना पंढरपूरला दर्शनासाठी पाठवण्यात आले. या सर्व भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी रुद्राक्ष ट्रॅव्हल्सच्या ११ स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. सहभागी सर्व भाविकांच्या चहापाणी, फराळ याची सोय मोफत करण्यात आली होती. अतिशय उत्साही वातावरणात, पांडुरंगाचा गजर करीत ही वारी पंढरपूरला सकाळी ६ च्या दरम्यान रवाना झाली आणि सायंकाळी ११ च्या सुमारास सर्व भाविकांना घेऊन सुखरूप परत आली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ मेदगे यांच्यासह त्यांच्या सहकारी मित्रांनी परिश्रम घेतले.
0 Comments