जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हिसामाबाद उजेड येथे माता पालक मेळावा उत्साहात
शिरूर अनंतपाळ: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हिसामाबाद उजेड येथे या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली प्रवेशित विद्यार्थ्यांच्या माता पालकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शाळा पूर्व तयारी संबंधाने माहिती देण्यात आली. मातांची मुलांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. सहज शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचा शैक्षणिक विकास कसा करता येईल हे प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आले.
"दैनंदिन एक तास पाल्यांसाठी" हा उपक्रम राबविण्याचा संकल्प या प्रसंगी मातांनी केला. मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शाळा सदैव कटिबद्ध असून आपली साथ मोलाची ठरेल अशी अपेक्षा मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
माता पालक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जयश्री कुमदाळे, श्रीदेवी गरगटे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments