औशाची ग्रामरोजगार सेवक संघटना ग्रामरोजगार सेवकांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण स्थळी भेट
बी डी उबाळे
औरंगाबाद: आपल्या विविध मागण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. दहा दिवस होत आहे तरी प्रशासनाने उपोषणकत्यांची दखल न घेतल्याने ग्रामरोजगार सेवकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. गेल्या 17 जून 2023 पासून राज्यातील ग्रामरोजगार सेवक हे त्या त्या जिल्ह्यातील विभागीय आयुक्त कार्यालयसमोर उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथे आमरण उपोषण करत आहेत. दहा दिवस होत आले आहेत तरीही ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष करत झोपेचे सोंग घेतले जात आहे. ग्रामरोजगार सेवक हे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने उपोषणे करत आहे. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भेट दिली.
शासन मात्र ग्रामरोजगार सेवकांप्रति इतके उदासीन का ? आहे हे मात्र अस्पष्ट आहे. ग्राम रोजगार सेवकांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या या करिता अर्धनग्न आंदोलनही करीत प्रशासनाचा निषेध केला. २९ मे २०२३ चा शासन निर्णय रद्द करावा, ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 12 हजार मानधन द्यावे, दुसऱ्या ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करू नये, अर्धवेळ असलेला जीआर पूर्ण वेळ करावा, यासह अनेक मागणीसाठी ग्रामरोजगार सेवकांनी उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्राम रोजगार सेवक या उपोषणात सहभागी झाले यामध्ये औसा तालुक्यातील 5775 चे औसा तालुका अध्यक्ष बालाजी उबाळे, लातूर जिल्हा ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष भागवत शिंदे, उपाध्यक्ष महेश कोळी, अंकुश जाधव, बालाजी रेड्डी, गोरख कांबळे, विठ्ठल पांचाळ , शंके, गोरे महादेव, पद्माकर तऊर यांच्यासह अनेक मान्यवर उपोषण स्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे.
0 Comments