गटविकास अधिकारी यांनी ८८ भाविकांसह केली पंढरीची वारी
बी डी उबाळे
औसा: लातूरचे गटविकास अधिकारी यांनी त्यांचे मूळ गाव असलेले माचरटवाडी(भालकेवाडी) ता. निलंगा येथून एकादशी निमित्त स्वतः आणि स्वतः सोबत ८८ वारकऱ्यांना सोबत घेऊन ते पंढरपूर वारी पूर्ण केली.
माचरटवाडी (भालकेवाडी) या गट विकास अधिकारी तथा सिंघम गट विकास अधिकारी म्हणून औसा येथे आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्याच पद्धतीने काम सध्या लातूरला सुरू असून मूळ गावातील ८८ वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन जाण्याचा योग आला.
त्याचं गाव हे छोटासं असलं तरी सर्वजण मिळून दरवर्षी सप्ताह साजरा केला जातो,दर शनिवारी हनुमान चालीसा वाचन होऊन मारुती ची पूजा केली जाते. अश्याच एका पूजेवेळी पायी वारीला जाने शक्य नसलेल्या लोकांसाठी पंढरपूर दर्शनाला जाण्याबाबत चा विषय चर्चेला जाऊन दिनांक 16 व 17 जून ला जाण्याचे ठरले.
पंढरपूर ला विठलाचं दर्शन संत वासुदेव महाराज मठ, शेगाव-पंढरपूर येथे मुक्काम आणि सकाळी अक्कलकोट ला स्वामी समर्थ यांचे दर्शन आणि महाप्रसाद घेऊन संध्याकाळी तुळजापूर येथे आई तुळजाभवानी चे दर्शनाचे ठरवून उत्साहात दर्शन घेतले.
यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विठ्ठल भक्तांसाठी पंढरपूर ला जाण्यासाठी च्या विठाई या विशेष बसने सर्व भाविक दर्शनासाठी गेले होते. गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांनी प्रवास, निवास व चहा नाश्त्याची सोय केली तर पंकज भालके यांनी मुक्कामाच्या ठिकाणी सर्व भाविकांना रात्रीच्या जेवणाची भाविकांना पंगत दिली. या बस वारीचे नियोजन ज्ञानोबा पाटील, धीरज भालके, शिरीष भालके, दत्ता नागिमे, पिंटू चव्हाण महिला भाविकांसाठी उर्मिला भालके यांनी केले. प्रत्यक्ष 16 तारखेला रावसाहेब भालके व राजू पाटील यांनी नारळ फोडून भाविकांच्या बसचे प्रस्थान करून सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
2 दिवसाच्या दर्शनादरम्यान दिलीप भालके, गणेश भालके, बाळू भदरगे, महेश टमके, संतोष लांबूटे यांनी सर्व भविकात समन्वय करून सर्वांचा प्रवास सुखाचा केला. महिला वर्गात समन्वयक म्हणून राजाबाई लांबूटे, वंदाबाई नागीमे, सुरेखा कवठकर, महानंदा भालके, मंगल टमके यांनी भूमिका बजावली. अनंत चव्हाण, विजयकुमार हत्तरगे यांनी बसेसचे सारथ्य करून सर्वांना सुखरूप दर्शन घडवून आणले.
माचरट वाडी (भालकेवाडी) गावात नेहमीच विविध समाजिक उपक्रम होत असतात. गावातील आबालवृद्ध एकोप्याने सर्व उपक्रम साजरे करतात. वृक्षलागवड, सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान कार्यक्रम, सप्ताह आणि पंगत या आणि अश्या उपक्रमाने गावातील लहान मुलांवर चांगले नागरिक बनण्याचे संस्कार कृतीतून केले जात आहेत.
0 Comments