Latest News

6/recent/ticker-posts

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या युवा करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या युवा करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


औसा : ग्रामीण भागातील युवकांनी व्यवसाय शिक्षण घेऊन नवनवीन उद्योगांकडे वळावे आणि यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असे आश्वासन औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी युवकांना दिले. जिल्ह्यातील औसा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आणि समुपदेशन मेळाव्याच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले.

ग्रामीण भागातील युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय, उद्योग, रोजगाराच्या संधी या विषयी सखोल मार्गदर्शन आणि समूपदेशन व्हावे यासाठी आयोजित या भव्य शिबिराचे उद्घाटन औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी औसा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, पोलीस उपाधीक्षक आर.जे.इंगवले, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी वाय.आर. म्हेत्रे यांची प्रमुख अतिथी म्हणून होती.

औसा एमआयडीसी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपन्न झालेल्या या युवक मेळाव्यात तब्बल 987 युवक युवतींनी सहभाग नोंदविला. आर्थिक साक्षरता, शैक्षणिक कर्ज, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, आयटीआय मध्ये उपलब्ध विविध अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी याबाबत निलेश तांबे, शिवानंद जवळे, रमेश भारती, डॉ.महेश मोरे, गोपाळ पवार, प्रा.एस.एस. जाधव या मान्यवर तज्ञांचे मार्गदर्शन मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांना लाभले.

जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी एस.बी.वाघमारे, कौशल्य व रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त बी.एस.मरे तसेच औसा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या आय.टी.रणभिडकर, सहायक अधिव्याख्याता प्रा.अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि कर्मचाऱ्यांनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments