Latest News

6/recent/ticker-posts

भव्य सायकल रॅली काढून जागतिक महिला दिन साजरा

भव्य सायकल रॅली काढून जागतिक महिला दिन साजरा


लातूर: आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि जागतिक स्थूलता दिनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूरच्या वतीने महिलांची भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीचा शुभारंभ डाॅ समीर जोशी, अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सौ.आशाताई भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ लक्ष्मण देशमुख, डाॅ रमेश भराटे उपाध्यक्ष IMA महाराष्ट्रराज्य, डाॅ प्रशांत माले, डाॅ शुभांगी राऊत, डाॅ श्वेता काटकर, डाॅ श्रीधर पाठक, डाॅ मद्रेवार यांच्या हस्ते करण्यात आला. आशाताई भिसे, डाॅ शुभांगी राउत यांनी उपस्थित महीलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छां दिल्या.

डाॅ समीर जोशी यांनी लठ्ठपणा व त्यामुळे होणारे आजार या बाबत माहीती देऊन नियमित व्यायामाचे महत्व विशद केले. या रॅली करिता लातूर सायकलिस्ट क्लब, मॉम विथ व्हिलस, सायकल बड्डीस यांनी सहआयोजन करून सहभाग नोंदविला. यावेळी नर्सिंग स्कूल बाभळगाव येथील मुलींनी मुलगी वाचवा यावर पथनाट्य सदर केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ आनंद कलमे यांनी केले. रॅली यशस्वी करण्यासाठी डॉ. सारीका देशमुख, डॉ. प्रशांत कापसे, डाॅ विमल डोळे, सौ पाठक, श्री उगले, विकास कातपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा शल्य चिकिस्त अंतर्गत अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.शहर पोलीस वाहतूक शाखेने या रॅलीस सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments