Latest News

6/recent/ticker-posts

केसरी शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य ऐवजी आता थेट रोख रक्कम मिळणार;पुरवठा अधिकारी लालासाहेब कांबळे यांची माहिती

केसरी शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य ऐवजी आता थेट रोख रक्कम मिळणार;पुरवठा अधिकारी लालासाहेब कांबळे यांची माहिती

बी डी उबाळे 

औसा: तालुक्यातील एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम शिधापत्रिका धारकाच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या आयपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्य ऐवजी दरमहा 150 रुपये रोख रक्कम शिधापत्रिका धारक यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

सदरील योजने अंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करावयाची असून महिला कुटुंब प्रमुख यांनी तात्काळ कोणत्याही बँकेचे खाते एक आठवड्याच्या आत काढून ते आधार संलग्न करून घेण्यात यावे व सदर पासबुक व शिधापत्रिकेची छायांकित प्रत संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे देण्यात यावी असे आवाहन तहसीलदार भरत सूर्यवंशी व पुरवठा अधिकारी लालासाहेब कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार अन्वये केले आहे.

Post a Comment

0 Comments