Latest News

6/recent/ticker-posts

तुर्भेच्या कराटे प्रशिक्षिका रजनी गुप्ताची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड नवी मुंबई:(मनोज बरडे)

तुर्भेच्या कराटे प्रशिक्षिका रजनी गुप्ताची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड

नवी मुंबई:(मनोज बरडे) विठ्ठल दळवी तुर्भे नाका आंबेडकर नगर येथील रहिवासी कराटे प्रशिक्षिका रजनी गुप्ता या युवतीची निवड नेपाळ येथे मे 2023 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे. याबद्दल आ. गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक अमित मेढकर, माजी नगरसेवक मुनावर पटेल, समाजसेवक अंकुश मेढकर, समाजसेवक अमर मेढकर, शानू ढाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तुर्भे सारख्या झोपडपट्टी परिसरामध्ये राहून रजनी गुप्ताने कराटे खेळामध्ये घवघवीत यश मिळवले आहे. यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय आणि विभागीय स्पर्धांमधून तिने सुवर्णपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील तिला सुवर्णपदक मिळेल अशा शुभेच्छा आ. नाईक यांनी तिला दिल्या. तर रजनीचे यश इतर मुलींसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अमित मेढकर यांनी केले. 

Post a Comment

0 Comments