योग प्रशिक्षिका सोनम केवटचा योगामध्ये विश्वविक्रम
मुलुंड: आशिहारा कराटे इंटरनॅशनलच्या कराटे प्रशिक्षिका आणि यश एमजी कॉलेजच्या शिक्षिका सोनम दुर्वेश प्रकाश केवट यांनी योगासन(शीर्षासन) मध्ये २ मिनिटे ४४ सेकंद दोन्ही पाय आत आणि बाहेर हलवून विश्वविक्रम केला आहे. त्यांच्या या कामगिरीबाबत कालिदास हॉल कॅम्पस येथे वर्धापन दिनानिमित्त त्यांचा शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभ जस्ट फॉर किड्सच्या संचालिका शीतल जोशी यांनी आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख मार्गदर्शक डॉ. बाबुलाल सिंग उपस्थित होते.
दयाशंकर पाल व ठाणे महापौर, माजी प्रभारी मुख्याध्यापक राजकुमार यादव, डॉ. सचिन सिंग, डॉ. आर. एम. पाल, सुरेंद्र मिश्रा, समता हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शरीफ खान यांनी सोनम केवटचे योगात विश्वविक्रम केल्याबद्दल अभिनंदन केले व भविष्यात आणखी नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी या वेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवट यांनी कराटे प्रशिक्षण आणि महाविद्यालयात केवळ व्याख्याताच नाही, तर ५०० हून अधिक कविता रचून कवयित्री होण्याचा मान देखील मिळवला आहे.
0 Comments