Latest News

6/recent/ticker-posts

औश्यात अतिक्रमण विरोधात राष्ट्रवादीला यश

औश्यात अतिक्रमण विरोधात राष्ट्रवादीला यश


शेख बी जी

औसा: दि.6 - शहरात शासकीय रुग्णालया समोरुन जाणाऱ्या रस्त्यालगत अतिक्रमण होत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला यश आले. मुख्याधिकारी यांनी सक्तीचे आदेश काढत अतिक्रमण थांबवण्यास आदेशित केले आहे.


याबाबत सविस्तर माहिती शहरातील कुरेश गल्ली, खडकपुरा, भुई गल्ली, काझी गल्ली, मोमीन गल्ली, यांना जोडणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेला केली होती. अतिक्रमण दूर नाही झाल्यास आंदोलन केले जाईल अशा आशयाचे निवेदन पालिकेला दिले होते. माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख माजी नगराध्यक्ष जावेद शेख, उमर पंजेशा, इनामदार, माजी नगराध्यक्षा किर्ती ताई कांबळे आदी अंदोलन स्थळी उपस्थित होते. या अनुषंगाने आज दिनांक 6 रोजी दहा वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात देखील झाली होती.



या आंदोलनाची दखल घेत पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी सदर होत असलेल्या कामास स्थगिती देऊन अतिक्रमण दूर करण्याचे आदेश पारित केले आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या या आंदोलनास यश मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाच तारखेला निवेदन तर सहा तारखेला एक दिवसीय आंदोलन केल्याने शहरातील होणार्‍या अतिक्रमणास आळा बसल्याने कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments