जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणी अंकुलगा शाळेत भाजीपाला लागवड; शाळेचा स्तुत्य उपक्रम
लातूर: राणी अंकुलगा ता शिरूर अनंतपाळ या शाळेमध्ये भाजीपाला लागवड करण्यात आला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा सध्या सुरू आहे.
या शाळेमध्ये लागवड करण्यात आलेला भाजीपाला आणि फळझाड असून याची संवर्धन आणि अंतर्गत मशागत ही शिक्षक विद्यार्थी यांच्याकडून केली जाते आणि हा भाजीपाला कोणतेही नैसर्गिक फवारणी केलेली नाही तो नैसर्गिक रित्या चांगल्या पद्धतीने पिकविण्यात आणि लागवड करण्यात आलेला हा फळझाडे आणि भाजीपाला असून हा दैनंदिन जीवनामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी ही बाब आहे या ठिकाणी मध्यान व भोजनाच्या वेळी या भाजीपाल्याचा वापर विद्यार्थी शिक्षक वृंद करतात त्यामुळे या शाळेचा स्तुत्य उपक्रम हा तालुक्यामध्ये चर्चिला जात आहे.
या कामी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांच्या मेहनतीने फुललेला हा शाळेतील एक आगळावेगळा भाजीपाला मळा असल्याचे दिसून येत आहे. याचा आदर्श इतर शाळेनेही घ्यावा असा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे या ठिकाणी भेट दिल्यानंतर नक्कीच दिसून येत आहे.
0 Comments