Latest News

6/recent/ticker-posts

ग्राम सेवकांच्या संपाने औसा पंचायत समितीमध्ये शुकशुकाट

ग्राम सेवकांच्या संपाने औसा पंचायत समितीमध्ये शुकशुकाट


बी डी उबाळे 

औसा: अंदाजे 2005 च्या दरम्यान तत्कालीन महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केल्याने त्याच्या झळा दैनंदिन जीवनामध्ये पोहोचत असल्याने या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात एकच मिशन जुनी पेन्शन, ही आखरी लढाई असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करणे सुरू आहे. याकरिता सर्व कर्मचारी एकत्रित येऊन हा बंदचा नारा देण्यात आला आहे. या बंदमध्ये सर्व कर्मचारी सहभागी झाले असून त्यांचे "एकच मिशन सुरू करा जुनी पेन्शन"असे संपाने आंदोलन सर्व महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांनी,निमशासकीय,शिक्षक यांनी दिनांक 14 मार्च 2023 पासून 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता.


दररोज पंचायत समितीमध्ये सर्व कर्मचारी कामानिमित्त येत असल्याने आणि त्यांच्याकडे गावोगावचे नागरिक कामानिमित्त येत असल्याने ही पंचायत समिती वाहनाने आणि नागरिकांनी गजबजलेली रहात असे परंतु पेन्शन संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्याने ही पंचायत समिती अगदी शांत आणि निर्मनुष्य दिसून येत होती.

हे सरकारी कर्मचारी आमदार खासदारांना पेन्शन आहे त्यांना पगार आहे त्यांचे ते सर्व शासकीय तिजोरीतून करोडो रुपयांचा बोजा टाकून त्यांचे लाड पुरविले जाणारे हे लाड बंद करून जो कर्मचारी तीस वर्षे चाळीस वर्षे देशाची सेवा इमाने इतबारे करतो अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही ती पेन्शन द्यावी आणि आमदार खासदार जे पाच वर्षे निवडून येतात आणि आजीवन पेन्शन मिळवतात त्यांची पेन्शन बंद करावी. अशी ही मागणी या संपाच्या माध्यमातून पुढे येत आहे.

Post a Comment

0 Comments