महावितरणच्या जनमित्रांच्या गौरव लाईनमन दिवस उत्साहात साजरा
बेलकुंड:(प्रतिनिधी/महेश कोळी) ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जनमित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरणतर्फे शनिवारी (4 मार्च) लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उप कार्यकारी अभियंता औसा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली. यावेळी सर्व जनमित्रांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तेगुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सहाय्यक अभियंता औसा आश्विन घोंगडे यांनी जनमित्रांना शुभेच्छा संदेश दिला. यावेळी सहाय्यक अभियंता बेलकुंड अमित शिंगारे यांनी विद्यत सुरक्षेबाबत जनमित्रांचे प्रबोधन केले. जनमित्रांच्या वतीने अजित गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक अभियंता उजणी थोरकर ,एल डि सी सचिन सुरवसे, साळुंखे मॅडम यांनी लाईनमन दिवसाच्या शुभेच्छा देऊन जनमित्रांच्या कामाचा गौरव केला.
डेपोटी ऑपरेटर डि एस कटके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास फोरमेन चांद शेख लाईनमन महादेव आव्हाड सिद्धेश्वर सर्जे अजित गाढवे सुभाष येरटे रमेश टोम्पे, संतोष कबले, सचिन पठाडे, विशाल भोजने, कृष्णा भोजने, मुकुंद सर्जे, किरण चव्हाण, तसेच उप कार्यकारी कार्यालय औसा येथील शाखा अभियंते व साठहुन अधिक जनमित्र उपस्थित होते.
0 Comments