Latest News

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त भादा ग्रामपंचायत कडून महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भादा ग्रामपंचायत कडून महिलांचा सत्कार


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील ग्रामपंचायत कडून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भादा ग्रामपंचायत मध्ये सकाळी 11:00 वाजता भादा येथील अंगणवाडी कर्मचारी यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निमंत्रित करण्यात आले.

यानंतर ग्रामपंचायत कडून आकर्षक प्रशस्ती प्रमाणपत्र, शाल, गुलाब पुष्प देऊन सर्व अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका सुचिता कटके आणि भादा येथील अंगणवाडी कार्यकर्ती कुसुम उबाळे, अर्चना उबाळे, भागीरथी पाटील, शीला कोळी, दैवशाला कात्रे, सुषमा माळी, सरिता आगलावे, कुलकर्णी, मदतनीस आशालता उबाळे, मंगल गोरे, ज्योती कुंजीर, तस्लिम खोजे, सुवर्णा माळी, महांनदा गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भादा सरपंच मिनाबाई दरेकर, एकात्मिक बाल विकास अधिकारी येथील कर्मचारी कुंभकर्ण आणि कलशेट्टी मॅडम सह ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, ग्राम पंचायत सदस्य योगेश लुटुरे, नंदू फरताळे, बी डी उबाळे, लखन लटूरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments