Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूर-सुरक्षित लातूर पोलीस दलाचा उल्लेखनीय लातूर पॅटर्न

मुक्त पत्रकार सतीश तांदळे यांच्या लेखणीतून.....

माझं लातूर-सुरक्षित लातूर पोलीस दलाचा उल्लेखनीय लातूर पॅटर्न


ऐंशीच्या दशकात आलेल्या जंजीर या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेला इन्स्पेक्टर विजय आजही माझ्यासह अनेकांना स्मरत असेल. चित्रपटात प्राण यांनी साकारलेला खलनायक शेरखान जेंव्हा इन्स्पेक्टर विजयला न विचारताच बसण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा :

"जब तक बैठने को ना कहा जाय, शराफत से खडे रहो...

ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही!"

या डायलॉगने अमिताभ आणि त्याने साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्याला देशातील सर्वसामान्य लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

जंजीर पासून सुरू झालेला दबंग पोलीस अधिकाऱ्यांचा चित्रपट प्रवास आजतागायत सिंघमच्या भूमिकेपर्यंत आणि यापुढेही सुरूच राहील. अशा दबंग अधिकाऱ्यांना आपला आदर्श मानणारा तरुण वर्ग मोठा आहे. पोलिसांवरील जनतेचे हे प्रेम कधीही कमी होऊ नये यासाठी पोलीसांनी देखील अधिक जबाबदार आणि तत्पर होणे आवश्यक आहे. चित्रपट समाजमनाचा आरसा असतो. ज्याप्रमाणे सैनिक देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो त्याचप्रमाणे देशात, राज्यात, जिल्ह्यात, स्थानिक पातळीवर पोलीस आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची हमी घेतात. लातूर जिल्हाही याला अपवाद नाही मात्र कर्तव्यदक्ष आणि दबंग पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत लातूर जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिकच सुदैवी ठरला आहे. जिल्हा निर्मितीपासूनच अशा दबंग पोलीस अधिकाऱ्यांनी लातूरचा सामाजिक, धार्मिक सलोखा कायम राखला. सामाजिक सुरक्षा, शांतता, कायदा-सुव्यवस्था यावर कधीही तडजोड न करता समाजविघातक प्रवृतींचा वेळीच बंदोबस्त केला.

अशात घडलेल्या काही घटनांमुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खचलेले आपण पाहिले होते. याला काही अंशी आपण नागरिकही जबाबदार असतो. सुजाण नागरिक म्हणून पोलिसांना मदत आणि सहकार्य करणे हे आपले कर्तव्य असते. या कर्तव्यात कसूर झाला की मग पोलीस आणि सामान्य जनता यात दरी निर्माण होत असते. गुन्हेगारी, जुगार, अवैध धंदे, खंडणी, चोरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही दक्ष राहून पोलीस प्रशासनास मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. लातूर जिल्हा पोलीस दलानेही अशा प्रवृतींचा वेळीवेळी बंदोबस्त करून यावर जरब बसविण्यात यश मिळवले आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल जे काही सकारात्मक उपक्रम राबवतील अशा सर्व उपक्रमांना लातूरकरांचा नेहमी पाठिंबा राहिला आहे.


शहरातील खाजगी शिकवणी भागात तरुणांची वाढत असलेली गुंडागर्दी, दहशत तसेच कॉफी सेंटरच्या नावाखाली होत असलेला गैरप्रकार यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पोलिस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभे झाले. याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या भागात पोलिसांची गस्त वाढविली. अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. ज्या ठिकाणी पोलिसी खाक्या आवश्यक आहे तिथे बिनदिक्कतपणे तो वापरावा आणि तो वापरलाच पाहिजे तरच लातूरचे वैशिष्ट्य जपले जाईल. लातूर जिल्ह्याला आजवर लाभलेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या सर्व कर्तव्यदक्ष, निर्भीड, तत्पर, दबंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे. लातूरच्या सुरक्षेसाठी, शांततेसाठी, सलोख्यासाठी आपण करीत असलेले कार्य नक्कीच कौतकास्पद असून पोलिसांचा हा लातूर पॅटर्न कायम राहील याची काळजी आपणही घेऊ या.

जय हिंद!!!

Post a Comment

0 Comments