भादा येथे बिहार पॅटर्न वृक्षलागवडीला टँकरने पाणी ग्राम विकास अधिकारी करतात झाडांची पाहणी
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे लातूर जिल्ह्यात नव्हे असा बिहार पॅटर्न वृक्ष लागवडीचा मोठा उच्चांक केला असून या लागवडीची चर्चा संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असून सध्या औसा तालुक्यात या "बिहार पॅटर्न वृक्ष लागवडी" चा "भादा पॅटर्नवर वृक्ष लागवड" होण्यास काहीही वेळ लागणार नाही. कारण संपूर्ण तालुक्यामध्ये जितकी वृक्ष लागवड केली नाही त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा सपाटा भादा ग्रामपंचायत कडून लावण्यात आल्याने संपूर्ण औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यात या वृक्ष लागवडीची मोठी चर्चा आहे.
ही चर्चाच नुसती चर्चा राहू नये याकरिता ही वृक्ष लागवड करणारे जनक म्हणून भादा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बालाजी शिंदे(बिएम्) यांनी मोठ्या प्रमाणात हे वृक्ष जगले पाहिजे याकरिता या वृक्षाकरिता विविध भागातील शेतकऱ्याकडून या झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचन ची व्यवस्था तर केलीच आहे. परंतु या झाडांना पाणी कमी पडू नये याकरिता त्यांनी स्वतः तीन टँकरची व्यवस्था केलेली आहे. ही व्यवस्था पाहण्यासाठी त्यावर वेगळे मजूर लावलेले आहेत.
जेणेकरून कोणत्याही भागातील झाडांना पाणी कमी पडणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही व्यवस्थेमध्ये कोणताही बदल होऊ नये म्हणून भादा ग्रामपंचायतला लाभलेले कार्य तत्पर कोणतीही बाब कागदावर घेणारे दक्ष असे ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी हेही स्वतः विविध भागांमध्ये वृक्षांची पाहणी करून लागवड करण्यात आलेली वृक्ष हे 60 ते 70 टक्के या उन्हाळ्यामध्ये जगलीच पाहिजे.
याकरिता नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे भादा गावामध्ये ग्राम विकास अधिकारी येतात ते वृक्ष लागवडीची काय स्थिती आहे याकरिता कामांमध्ये कोणतेही दिरंगाई न करता ते स्वतः झाडे लागवड केलेल्या भागांमध्ये जाऊन त्या ठिकाणी कोणते काम चालू आहे यामध्ये पाणी देणे किंवा उन्हाळ्यामध्ये वृक्षांना मोठ्या प्रमाणात झळा पोहोचू नये याकरिता त्यांच्या मुळाशी टाकण्यात येणारे भुसा,गुळी याची पाहणीसह पाणी देण्यात येणाऱ्या वृक्षांना व्यवस्थित रित्या पाणी मिळते का?याची पाहणी करून त्या कामावर असणाऱ्या मजूर कामगारांना योग्य सूचना देऊन ते आपल्या दैनंदिन कामाकडे वळतात. असा हा त्यांचा दिनक्रम असल्याने भादा गावातील वृक्ष लागवड या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 60% तरी वृक्ष लागवड केलेली वृक्ष जगलीच पाहिजे असा मानस ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
0 Comments