Latest News

6/recent/ticker-posts

सांगवीवाडीच्या ग्रामस्थांचा रस्त्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा

सांगवीवाडीच्या ग्रामस्थांचा रस्त्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा

सागर तापडिया

निलंगा: निलंगा तालुक्यातील सांगवी वाडी गावास अद्याप पर्यंत पक्का रस्ता नाही.सांगवीवाडी ते सांगवी(जे) हे 3 किमी. अंतर आहे पण येथील रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे ये-जा करण्यासाठी ग्रामस्थांना खुप त्रास होतो. त्यामुळे येत्या २० मार्चपर्यंत रस्त्याचे काम सुरु न झाल्यास २१ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.

निलंगा तालुक्यात असलेल्या सांगवी वाडी गावास अद्याप पक्का रस्ता नाही. साधारण शंभर कुटुंब येथे आहेत. कोणतेही वाहन ये-जा करीत नाही. रात्री-अपरात्री जर कोणाला दवाखान्यात दाखल करायचे झाले, तर तिन किलोमीटर अंतरावर उचलून खांद्यावर सांगवीला न्यावे लागते व तिथून पुढे दूसरे शहर गाठावे लागते, ही अवस्था या गावाची आहे. तो पर्यंत आजारी माणूस रामभरोसे असते. येथे गेल्या दहा वर्षांत सात ते आठ नागरिकांना उपचाराविना आपला जिव गमवावा लागला आहे. गरोदर माता व लहान बालके आजारी असले तर त्या कुटुंबाची चिंता काय असते, हे विचार न केलेलाच बरा. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा शासनस्तरावर मागणीही केली. निवेदन देण्यात आली. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून चिखलात माणसांना चालणे कठीण होते. दुचाकीची अवस्था तर त्याहून बिकट होते. त्यामुळे येत्या २० मार्चपर्यंत रस्त्याचे काम सुरु न झाल्यास २१ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करुन सामूहिक आत्मदहन करु, असा इशारा सांगवी वाडीच्या ग्रामस्थांनी लातूर येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Post a Comment

0 Comments