Latest News

6/recent/ticker-posts

गणेश पुंडे साहित्य वाचस्पती(मानद डॉक्टरेट) अवॉर्ड ने सन्मानित

गणेश पुंडे साहित्य वाचस्पती(मानद डॉक्टरेट) अवॉर्ड ने सन्मानित


लातूर: इतिहास पुरातत्व तथा संशोधन संग्रहालाय बालाघाट मध्यप्रदेश द्वारा आयोजित एकवीसाव्या अनोख्या सोहळ्यात महाराष्ट्रातील लातूर जिल्यातील ग्रामीण कवी गणेश तुकाराम पुंडे यांना त्यांच्या साहित्य तथा सामाजिक कार्याची दखल घेत साहित्य वाचस्पती(मानद डॉक्टरेट) अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील एकोणीस राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.मध्यप्रदेशातील वैनगंगा तटावर वसलेल्या बालाघाट येथे इतिहास पुरातत्व आणि संशोधन संग्रहालय अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दिव्य सोहळ्यात विविध क्षेत्रातील विशेष व्यक्तिमत्वचा सन्मान करण्यात आला अशी माहिती संग्रहलायचे मुख्याधिकारी अध्यक्ष डॉ वीरेंद्रसिहं गहरवार तथा कविता गहरवार यांनी दिली.

महाराष्ट्रातील लातूर जिल्यातील छोट्याश्या खेड्यातून आलेले कवी गणेश पुंडे यांनी आजपर्यंत तालुका,जिल्हा,विभाग,राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सन्मान प्राप्त केले आहेत त्यांच्या या प्रवासाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. डॉ गहरवार यांनी त्यांच्या कार्याचे यशाचे कौतुक करत त्यांना मानद डॉक्टरेट पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे अशा शब्दात मान्यवरांनी गणेश पुंडे यांचे अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमांस प्रमुख अतिथी म्हणून विश्वशांतीदूत डॉ सुधीर तारे,नोबल नामांकित, विश्वस्नेही बॉलिवूड प्ले बॅक सिंगर डॉ चंद्रकला सिंग, रमेश रंगलांनी, प्रदीप सिंग गल्होत, डॉ प्रेमप्रकाश त्रिपाठी, जगदीश चंद्र वर्मा,वीरेंद्र दुबे, दिनेश चंद्र प्रसाद, मुलचंद गुप्ता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments