लातुरकरांना पाहावयास मिळणार धनुर्विद्येचा थरार
राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धा: २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होणार रंगतदार सामने
लातूर: महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली लातुर जिल्हा धनुर्विधा क्रीडा संघटनेच्या वतीने लातुर येथील जिल्हा क्रीडा संकुलावर २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान १७ वर्षे वयोगातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून लातुरकरांना या स्पर्धेच्या माध्यमातून धनुर्विद्येचा थरार पाहावयास मिळणार असल्याची माहिती जिल्हा धनुर्विधा संघटनेचे सचिव अशोक जंगमे यांनी दिली.
लातुर येथे प्रथमच होत असलेल्या धनुर्विद्या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धनुर्धरांचे रोमांचीत धनुर्विद्या पाहावयास मिळणार आहे. इंडियन राउंड, रिकव्हर राउंड व कंपाउंड राउंड या तीन प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत राज्यभरातुन १००० खेळाडू, संघ मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, पंच, पदाधिकारी, तांत्रिक समिती, स्कोरर, स्वयंसेवक यांचा सहभाग असणार आहे. जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सहसचिव राजकुमार देवकर, सदस्य नवनाथ गरगटे, हणमंत केसरे, शिवाजी आळने, लक्ष्मीकांत जोगदंड, संजय बेंडले, आदींसह जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे धनुर्धर, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी स्पर्धेस उपस्तीथी नोंदवत स्पर्धेस रंगत आणण्याचे आवाहन भारतीय धनुर्विद्या महासंघाचे महासचिव प्रमोद चांदुरकर, जिल्हा धनुर्विधा संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे, सचिव अशोक जंगमे, यांनी केले आहे.
0 Comments