महाराष्ट्र विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
निटूर: दि. 22 - येथील महाराष्ट्र विद्यालयात आज स्वयंशासन दिन व निरोप समारंभ हे दोन्ही कार्यक्रम घेण्यात आले.
याप्रसंगी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र निळकंठराव धुमाळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गजेंद्र तरंगे, शरद सोळुंके, महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख दवणे, विविध कार्यकारी सोसायटी निटूर चे व्हाईस चेरमन दिनकर नाना निटुरे, लक्ष्मण मगर, नंदकुमार हासबे, राजाभाऊ तापडिया, राजाभाऊ सोनी, सूर्यवंशी, नाईकवाडे, पाटील, देशमुख, जाधव, निटुरे उपस्थित होते. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून जोशी यज्ञेश्वर बालाजी, उपमुख्याध्यापक म्हणून माडीवाले तय्यब, पर्यवेक्षक म्हणून साहिल शेख, तर शिक्षक म्हणून निखिल सोमवंशी, सागर पाटील, वेदांत सूर्यवंशी, शिवाजी भोयबार, संगपाळ रोहित, शहाबाज शेख, त्रिशा मोरे, श्रुती भालके, मोमीन मुस्कान, गुलजार माडीवाले, शुभांगी पौळकर, साक्षी सांगावे, पठाण शन्नो, रेणुका शिंदे, प्रेरणा सूर्यवंशी, अंजली बसवणे, सागर प्रगती, शिंदे संगीता, पुष्पा शिंदे, रुपाली बनसोडे, लिपिक म्हणून रोहित उपळे, तर सेवक म्हणून रुद्रमणी विभुते, शिंदे शैलेश, यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोयबार यांनी केले.
0 Comments