Latest News

6/recent/ticker-posts

रेशीम शेतीसाठी अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण- डॉ सचिन ओंबासे

रेशीम शेतीसाठी अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण- डॉ सचिन ओंबासे


तहसील कार्यालय: तुती लागवड पूर्व प्रशिक्षण 

उस्मानाबाद: पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी आज रेशीम शेतीकडे वळत आहेत हे शेतकऱ्यांसाठी त्यांचा आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, नवीन शेतकऱ्यांनी रेशीम लागवडी पूर्वी जुन्या अनुभवी रेशीम शेतकऱयांचे मार्गदर्शन घेणे अतिशय महत्वपूर्ण असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवीन रेशीम शेतकरीं उद्भवणाऱ्या अडचणी मात करत यशस्वी रेशीम शेतकरी होतील असे मत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी व्यक्त केले.

तहसील कार्यालयाच्या वतीने उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उस्मानाबाद तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व पोकरा अंतर्गत मंजूर  रेशीम लागवड शेतकऱ्यांसाठी तुती लागवड पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी(रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार गणेश माळी, जिल्हा रेशीम विकास अधिकारी आरती वाकुरे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, नायब तहसीलदार प्रभाकर मुगावे, क्षेत्रीय सहायक बाळासाहेब सुर्यवंशी, रेशीम शेतकरी बालाजी पवार आदींची प्रमुख उपस्तिथीबी होती.

बदलत्या हवामानामुळे शेतीतील नुकसान टाळण्यासह शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीने पारंपरिक शेतीला बगल देत रेशीम शेती कडे शेतकरयांचा कल वाढविण्यासाठी जिल्हाधिजकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाभरात सध्या महारेशीम अभियान राबविले जात असून त्यानुषंगाने जिल्ह्यातून १०००० एकर लागवडीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. उस्मानाबाद तालुक्यातून तहसीलदार गणेश माळी यांनी आजतागायत ५७१ लाभार्थी शेतकऱ्यांना रेशीम लागवड प्रस्तावातील प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सध्या जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात नर्सरी केली जाते त्यानुषंगाने उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना तुती लागवड पूर्व म्हणजेच नर्सरीचे प्रशिक्षण मंगळवारी देण्यात आले. प्रशिक्षणात आधुनिक रेशीम लागवड, तुती च्या नवीन विकसित जाती, नर्सरी साठी आवश्यक जागा, खत, रोप लागवडीच्या पद्धती यासह इतर आवश्यक माहिती बाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, तसेच रेशीम शेतीतील यशस्वी शेतकऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन करत अतिवृष्टी काळातही रेशीम शेतीमधुन घेतलेल्या उत्पन्नाविषयी अनुभव सांगत जिल्ह्याच्या विकासासाठी रेशीम शेतकरीही महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments