Latest News

6/recent/ticker-posts

धनुर्धर अनिकेत, आदित्य, भावना व समीक्षा राहिले अव्वल

धनुर्धर अनिकेत, आदित्य, भावना व समीक्षा राहिले अव्वल

राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धा: लातूरकर घेत आहेत स्पर्धेचा आनंद

लातूर: महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा संघटनेच्या वतीने लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित सब जुनिअर वयोगटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पहिल्या दिवशी इंडियन राऊंड प्रकारात साताऱ्याचा अनिकेत गावडे, पुण्याचा आदित्य चव्हाण, सोलापूरचे वैष्णवी पाटील, समीक्षा देशमुख आणि पुण्याच्या भावना सत्तेगीरी धनुर्धरांनी वर्चस्व प्रस्तापित ठेवत सुवर्णपदक पटकाविले आहे. स्पर्धेतील इंडियन राउंड प्रकारचे बक्षीस वितरण वरिष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे व हरिभाऊ गडगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे, सचिव अशोक जंगमे, कोशाध्यक्ष शिवाजी आळणे, शिवली ग्रामपंचायत सरपंच सुधाकर खडके, विजय जाधव, मोहन साळुंके, लक्ष्मीकांत जोगदंड, रमाकांत वरचे, धनंजय तट आदींची प्रमुख उपस्तीथी होती.

स्पर्धेचा अंतिम निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय प्रमाणे मुलींमध्ये ३० मी डिस्टन्स मध्ये भावना सत्तेगीरी ( पुणे ), समीक्षा देशमुख व वैष्णवी पाटील ( सोलापूर ), २० मी डिस्टन्स मध्ये समीक्षा देशमुख व वैष्णवी पाटील ( सोलापूर ), संचिता नाईक ( सातारा ) वैयक्तिक एलिमिनेशन मध्ये वैष्णवी पाटील ( सोलापूर ), ऋतुजा पवार ( नाशिक ) भावना सत्तेगीरी ( पुणे ) सांघिक एलिमिनेशन मध्ये गडचिरोली, पुणे आणि सोलापूर हे तर मुलांमध्ये ३० मी डिस्टन्स मध्ये अनिकेत गावडे ( सातारा ), हर्षल चौधरी ( जळगाव ), प्रसाद भांगे ( सोलापूर ), २० मी मध्ये आदित्य चव्हाण ( पुणे ), अनिकेत गावडे ( सातारा ), हिमांशू देशमुख ( नाशिक ), वैयक्तिक एलिमिनेशन मध्ये अनिकेत गावडे ( सातारा ), अमर डाखोरे ( यवतमाळ ), आदित्य चव्हाण ( पुणे ) सांघिक एलिमिनेशन मध्ये सातारा, क्रीडा प्रबोधिनी अमरावती तर मिश्र सांघिक एलिमिनेशन मध्ये अनिकेत गावडे, संचिता नाईक ( सातारा ), आदित्य चव्हाण, भावना सत्तेगीरी ( पुणे ) व प्रसाद भांगे, समीक्षा देशमुख ( सोलापूर ) स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा संचालक शुभांगी दळवी, मुख्य पंच प्रतीक थिटे, स्पर्धा डायरेक्टर ऑफ शूटिंग लक्षमिकांत खिची, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सहसचिव राजेश देवकर, हणमंत केसरे, नवनाथ गरगटे, भास्कर तामटे, सूर्यकांत साळुंके, नितीन डांगरे आदींसह जिल्हा धनुर्विधा संघटनेचे पदाधिकारी व धनुर्धर परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments