Latest News

6/recent/ticker-posts

मराठी अस्मितेचा इशारा वृत्त समुहाचा संविधान दिन विशेषांक वाळुंज यांना भेट

मराठी अस्मितेचा इशारा वृत्त समुहाचा संविधान दिन विशेषांक वाळुंज यांना भेट

वाशी: इशारा वृत्त समुहाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विशेषांकाचे प्रकाशन मुंबई वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त तथा लातूरचे भूमिपुत्र निसार तांबोळी यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित करण्यात आले आहे.

संविधानाची महती आणि वैशिष्ट्ये अधोरेखित करणारा इशाराचा हा विशेषांक व कालदर्शिका, संविधानाची उद्देशिका सेक्टर 15, वाशी चे भाजपाचे युवा नेते विजय वाळुंज व मा. नगरसेविका अंजली वाळुंज यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन विशेषांक भेट देण्यात आला. या प्रसंगी मराठी अस्मितेचा इशारा वृत्तपत्राचे मुख्य संपादक के वाय पटवेकर, के एल एम अँड फिटनेस फाउंडेशनचे संचालक तथा मराठी अस्मितेचा इशारा वृत्तपत्राचे नवी मुंबई प्रतिनिधी: मनोज बरडे, योगेश कोळंबे, कराटे प्रशिक्षिका रजनी गुप्ता आदी उपस्थित होते.

हा विशेषांक भारतीय संविधानाचे महत्व विषद करणारा दस्तावेज आहे. यात लिहिलेले लेख अभ्यासपूर्ण आणि वाचनीय असल्याचे मत मा. नगरसेविका अंजली वाळुंज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments