Latest News

6/recent/ticker-posts

संगीता कासार(जैन) यांचा जैन प्रकोष्ट तर्फे सत्कार

संगीता कासार(जैन) यांचा जैन प्रकोष्ट तर्फे सत्कार


लातूर: जैन प्रकोष्ट मराठवाडा प्रमुख शोभाताई कोंडेकर व त्यांची कार्यकारणी समूहाच्या वतीने "नेशन बिल्डर अवार्ड" शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदानासाठी मिळवल्याबद्दल समाजातील लाडक्या आमच्या भगिनी शिक्षिका- संगीता कासार (जैन) श्री गोदावरी देवी कन्या लाहोटी शाळा,लातूर यांचा छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यांना त्यांच्या निवासस्थानी सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कल्पना कुरकुट, शीला कडतने, दर्शना संगवे, ज्योती कोंडेकर, भाग्यश्री शहरकर, दर्शना मांडवकर, दैवशाला राऊत आदी भगिनी उपस्थित होत्या. यावर्षी मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जैन प्रकोष्ट व सकल जैन समाजाच्या वतीने त्यांना त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments