औसा तालुक्यात ऐतिहासिक बुद्ध लेणी खरोसा येथे धम्मपद महोत्सव २०२३ चे आयोजन
औसा: त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बुद्ध लेणी खरोसा ता. औसा जि. लातूर येथे मंगळवार दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य धम्मपद महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाची सुरुवात स. ९:३० वा. धम्म ध्वजारोहण होणार असून स. १०:०० ते ११:०० या वेळेमध्ये मुख्य बुद्ध लेणीत बुद्ध वंदना, स. ११:०० ते १२:३० वा. भोजन दान, दु. १२:३० ते ४:०० वाजेपर्यंत भिक्खू संघाची धम्मदेसना आणि सायं. ४:०० ते ५:०० या वेळेत भिक्खु संघास चिवरदान आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये पू.भदंत ज्ञानज्योती महाथेरो (ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर) यांच्यासोबत खरोसा बुद्ध लेणी ते श्रावस्ती बुद्ध विहारापर्यंत पायी धम्म पद यात्रा निघणार आहे.
त्यानंतर पू. भदंत ज्ञानज्योती महाथेरो ( ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर) यांची प्रमुख धम्मदेसना महाविहार सातकर्णी नगर, लातूर येथील पू. भिक्खु पय्यानंद थेरो, पू. भिक्खु बुद्ध शील आणि पू. भिक्खु इंदवंस, लातूर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या महोत्सवामध्ये प्रवीण गायकवाड, लातूर यांच्यावतीने थायलंड येथील पंच धातूची बुद्ध मूर्ती दान देण्यात येणार असून नितीन वाघमारे, लातूर यांच्यावतीने सर्वाना भोजन दान देण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये सर्वानी सहभागी होऊन धम्मदेसना आणि विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन धम्मपद महोत्सव, बुद्ध लेणी खरोसा, २०२३ चे संयोजक पू. भिक्खू सुमेधजी नागसेन आणि संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी केले आहे.
0 Comments