जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आमदारासह आयोजकावर गुन्हा नोंद करावा याचे निवेदन
शेख बी जी
औसा: दि. 22 - लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती निमित्त आयोजित मानवंदना कार्यक्रमांमध्ये आमदार टी राजा ठाकूर यांनी जातीय तेढ निर्माण होईल असे विधाने करून शांततामय असलेल्या वातावरणाला गढूळ करण्याचे काम केले आहे. सदरील भाषण हे पुतळा परिसरात नियम तोडून करण्यात आले आहे. भाषणात मुस्लिम द्वेष निर्माण व्हावा या उद्देशाने वक्तव्य करण्यात आली आहेत.
लातूरच्या संस्कृती च्या विरोधात हे भाषण असल्याचे निवेदनात म्हटले आहे. धर्मनिरपेक्ष लातूरमध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याने वातावरण कलुशीत झाले आहे. यामुळे सदरील आमदारा विरोधात व या कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हा नोंद करावा या आशयाचे निवेदन औसा काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारामार्फत गृहमंत्री यांना देण्यात आले आहे. निवेदनावर शेख शकिल शहराध्यक्ष, पुरुषत्तम नलगे, सय्यद खुंदमिर मुल्ला, पाशा शेख, अनिस जाहगिरदार, जयराज कसबे हमिद सय्यद, वसिम खोजन, इस्माईल शेख Adv. शाहनवाज पटेल, मुज्जमिल शेख, अशोक देशमाने, नियामत लोहारे, Adv. फय्याज पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments