नूर-ए-इमान सोशल ट्रस्ट तर्फे मुलांना खाऊ वाटप करुन अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरी
मुस्तफाभाई सय्यद
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चिखली येथील नूर-ए-इमान च्या ऑफिस मध्ये मस्जिद एरिया येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या एका जातीधर्माचे नव्हते तर ते सबंध मानवतेचे होते आणी म्हणुनच त्यांच्या आरमारात मुस्लिमांना पण मानाचे स्थान होते. अशा युगपुरुषाच्या जयंतीनिमीत्त नूर-ए-इमान ट्रस्टचे अध्यक्ष फिरोज शेख यांच्या हस्ते मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी लहान मुलांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवरायांच्या जयंतीला हजेरी लावली. चिखलीकरांनी या कार्यक्रमाचे मनापासुन कौतुक केले. असेच सामाजिक एकतेचे कार्यक्रम नूर-ए-इमान ट्रस्ट तर्फे राबवले जातात याबद्दल फिरोज शेख यांचंही अभिनंदन करण्यात आले.
0 Comments