Latest News

6/recent/ticker-posts

कंपाउंड धनुर्धर जय, स्मृती आणि वैष्णवीने साधला सुवर्णवेध

कंपाउंड धनुर्धर जय, स्मृती आणि वैष्णवीने साधला सुवर्णवेध


शालेय धनुर्विद्या स्पर्धा : ९ विभागातून २१६ धनुर्धरांचा सहभाग 

उस्मानाबाद: क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आर्चरी असोसिएशन ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्टच्या वतीने उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित १४ वर्षे वयोगातील राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत कंपाउंड राउंड मध्ये पुणे विभागाचे जय जाधव व स्मृती विरपे, नाशिक विभागाची वैष्णवी परदेशी यांनी सुवर्ण वेध घेत स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला.

स्पर्धेचे उदघाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या दिवशी झालेल्या कंपाउंड राउंड प्रकारातील स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे आणि जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, जिल्हा संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर, स्पर्धा संचालक अशोक जंगमे, स्पर्धा निकाल विभाग प्रमुख अभिजित दळवी, नितीन जामगे, किरण शानमे आदींसह खेळाडू पालकांची प्रमुख उपस्तीथी होती.

स्पर्धेचा अंतिम निकाल अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्य पदक पुढील प्रमाणे मुलींमध्ये ५० मी १ मध्ये स्मृती विरपे ( पुणे विभाग ), वैष्णवी परदेशी ( नाशिक विभाग ), संजीवनी काचेवाड ( औरंगाबाद विभाग ), ५० मी २ मध्ये वैष्णवी परदेशी ( नाशिक विभाग ), स्मृती विरपे व रायांश वाबळे ( पुणे विभाग ) सर्वसाधारण वैयक्तिक सर्वसमावेशक वैष्णवी परदेशी ( नाशिक विभाग ), स्मृती विरपे ( पुणे विभाग ), संजीवनी काचेवाड ( औरंगाबाद विभाग ) सांघिक मध्ये पुणे विभाग, नागपूर विभाग व व कोल्हापूर विभाग. तर मुलांमध्ये  ५० मी १ मध्ये जय जाधव ( पुणे विभाग ), ओम मानकर व वेदांत लेछोडे ( नागपूर विभाग ), ५० मी २ मध्ये जय जाधव ( पुणे विभाग ), अन्वित जाधव ( नाशिक विभाग ), वेदांत लेछोडे ( नागपूर विभाग ), वैयक्तिक सर्वसाधारण मध्ये जय जाधव ( पुणे विभाग ), वेदांत लेछोडे व ओम मानकर ( नागपूर विभाग ) सांघिक मध्ये नागपूर विभाग, पुणे विभाग व कोल्हापूर विभाग अश्या प्रमाणे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, सूत्रसंचालन अभय वाघोलीकर व वर्षा वाघोलीकर तर आभार जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीण गडदे यांनी मानले, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी फिल्ड इन्चार्ज कैलास लांडगे यांच्यासह यशोदीप कदम, प्रज्योत कावरे, बालाजी चव्हाण, गणेश बागल, हृतिक पडवळ, दीपक कांबळे, प्रसाद निंबाळकर, ओंकार चौरे, आदित्य काळे, मनोज जाधवर, सुरेश कळमकर, व्यंकटेश दंडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments