'एक बी' जगण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रमातून शिक्षिकेचा 5 वा क्रमांक
बी डी उबाळे
औसां: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संशोधन विभाग, राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धा2022-23 या स्पर्धेत जि. प. प्रशाला भादा येथील माध्यमिक शिक्षिका अनिता मारोती खडके यांनी माध्यमिक गटातून एक बी जगण्यासाठी, उद्यासाठी भविष्यासाठी या नवोपक्रमाला राज्यातून पाचवा क्र. मिळाला आहे. येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अनिता मारोती खडके यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. भादा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षिका अनिता मारोती खडके या मनोभावे शाळेत ज्ञानदान करीत असताना त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध स्पर्धेसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवितात.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्यातून एकमेव त्यांची निवड झाली असून ग्रामीण भागातील एका शिक्षिकेने आपल्या गुणवत्तेवर राज्यस्तरीय मजल मारली आहे. या अनुषंगाने एकूण त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची दखल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने घेतली असून पुणे येथे झालेल्या एका प्रशासकीय कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे सादरीकरण व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला परिषदेच्या उप संचालक डॉ कमला देवी आवटे, संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यामुळे त्याचे सरपंच, उप सरपंच,भादा प्रशालेतील शिक्षक शिक्षिका आणि शालेय समितीने अभिनंदन केले आहे.
0 Comments