Latest News

6/recent/ticker-posts

गुलाबी थंडीसोबत सुकापूर फेस्टिव्हलची धूम

गुलाबी थंडीसोबत सुकापूर फेस्टिव्हलची धूम


खाद्यपदार्थाची रेलचेल, कलाकुसरीच्या वस्तू आणि बरच काही…


आगरी जेवण या फेस्टिव्हलचे खास आकर्षण


मराठी अस्मितेचा इशारा वृत्त न्युज:-

पनवेल फेस्टिव्हलमध्ये खाऊ गल्ली ही खवय्यासाठी खास मेजवाणी ठरत आहे. खाद्य पदार्थाचे पाच स्टॉल  लावण्यात आले आहे. आगरी जेवणा सोबतच कोल्हापुरी, मालवणी तडका, अस्सल मराठमोळी जेवण,चायनिज पदार्थ, भेळ, पाणीपुरी असे पाच वेवेगळ्या व्हरायटीज आहेत. पण आगरी जेवण फ़ेस्टिवल मध्ये येणा-या लोकांच्या पसंतीस ठरत आहे. 

नवी मुंबई: स्व. एकनाथ भोपी यांच्या स्मरणार्थ शिवशोर्य प्रतिष्ठान सुकापूर व पनवेलचा राजा चिंंतामणी नवीन पनवेल यांच्या वतीने सुकापूर फेस्टिव्हल १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हला पनवेलकरांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. २०२३ च्या या सुकापूर फेस्टिव्हल उद्घाटन समारंभावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर, "मराठी अस्मितेचा इशारा" चे संपादक के.वाय.पटवेकर, युरेका अकॅडमीचे संचालक प्रा. विक्रम दांडगे, लोकमतचे वृत्तसंकलक अरुणकुमार मेहत्रे, फेस्टिव्हलचे संयोजक समितीचे पांडूरंग केनी, चेतन केनी, प्रा. धनंजय बेडदे, विश्वनाथ भोपी, रमेश राम आदी पनवेलकरांची उपस्थिती लाभली. यावेळी "मराठी अस्मितेचा इशारा" या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या संविधान दिन विशेषांक व कालदर्शिका आयोजन समितीचे प्रमुख यांना भेट दिली.

गाव, शहर आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणा-या पनवेल शहरात या दर्जेदार फेस्टिवल स्व. एकनाथ भोपी यांच्या स्मरणार्थ सुकापूर फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात उत्साह व आनंदाचे वातावरण तयार व्हावे व  सोहळ्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखिल करण्यात आले आहे.  स्व. एकनाथ भोपी यांनी आपले जीवन समाज कार्यासाठी वाहिले आहे. कोरोना काळात समाजासाठी अहोरात्र झटणा-या या  कर्तबगार व्यक्तीला काळाने हिरावून घेतले. त्यांच्या समरणार्थ हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आल्याने पनवेलकरांच्या मनात एकनाथ भोपी यांची कायम आठवण स्मरते आहे. या फेस्टिव्हलला लहान मुलांसाठी आनंददायी खेळणी, खाऊ गल्ली, मोठ्यासाठी आकर्षक विविध खरेदीचे दुकाने यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक वृत्तपत्र समुहात संपादक पद भुषवणारे लातूरचे संजय जेवरीकर यांना आमंत्रीत करण्यात आले होते. त्याचबरोबर मराठी अस्मितेचा इशारा चे संपादक यांचीही उपस्थिती मोलाची ठरली. गरिब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा आपल्या शाळेच्या माध्यमातून पोहचविणारे प्रा. धनंजय बेडदे यांनी देखिल या फेस्टिव्हला उपस्थिती दर्शवली. 

फेस्टिव्हलमध्ये महिलांसाठी पैठणीचे खास आकर्षण


सुकापूर फेस्टिव्हलमध्ये गुरु कदम दिग्दर्शित महिलांसाठी पैठणी शोचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर सदा बहार गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. साईबाबा गाणी, लावणी ला खास प्रेक्षकाकडून पसंती दर्शवण्यात आली. गुलाबी थंडीत आनंदमय कार्यक्रमाचा आस्वाद पनवेलकरांना सुकापूर फेस्टिव्हलमध्ये घेता आला.



Post a Comment

0 Comments