कै.नरसिंगराव चव्हाण विदयालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
चाकुर: तालुक्यातील नळेगाव येथील कै. नरसिंगराव चव्हाण विदयालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. भारतीय संस्कृती, देशभक्तीपर गीते, परंपरा, देशाच्या समस्या, लोकनृत्य, चित्रपट गिते, लावणी,इत्यादी विविधरंगी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
स्नेहसंमेलनाचे उदघाटन माजी पंचायत समिती सदस्य तथा संस्थेचे सहसचिव नारायण मुंजाणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत चव्हाण होते. यावेळी संस्थेच्या सचिव सविताताई चव्हाण, उपाध्यक्ष संभाजी भालेकर, कोषाध्यक्ष जयराम गटटेवार,अमृत हुडगे,भिमाशंकर फरकांडे,कैलास चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण, माजी सरपंच ए.के.कांबळे,पांडुरंग रेड्डी, सोसायटी अध्यक्ष शेषराव मुंजाणे, सुर्यकांत सावंत, खुदबोददीन घोरवाडे,उमाकांत सावंत, उद्धव बिराजदार आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सार्थक हुडगे शिष्यवृत्ती धारक व यश पवार राज्यस्तरीय खेळाडू यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चेतन चव्हाण यांनी केले. सूत्रसंचलन गोविंद वाघमारे यांनी तर आभार आशादेवी फरकांडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
0 Comments