Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूर परिवार करणार १०१ महाविद्यालयीन युवतींना मोफत हेल्मेटचे वितरण

माझं लातूर परिवार करणार १०१ महाविद्यालयीन युवतींना मोफत हेल्मेटचे वितरण

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त दिशादर्शक उपक्रम

लातूर: माझं लातूर परिवार आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील १०१ महाविद्यालयीन तरुणींना मोफत हेल्मेटचे वितरण करून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियान - २०२३ चा शुभारंभ झाला असून ११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत राज्यभर रस्ता सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने उद्या १७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता शहरातील दयानंद विज्ञान महाविद्यालय, हॉल क्रमांक ४२ मध्ये नोंदणीकृत १०१ महाविद्यालयीन दुचाकी धारक आणि चालक परवानाधारक युवतींना मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास सहायक उप प्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल, शहर वाहतूक पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला, उपनिरीक्षक आवेज काझी, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मिलिंद माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेल्मेट वितरण सोहळ्यानंतर मुख्य रस्त्यावरून बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह माझं लातूर परिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments