महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे जाजनूर येथे उद्घाटन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वार्षीक सात दिवशीय विशेष शिबिराचे उद्घाटन मौजे जाजनूर येथे झाले. या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक सय्यद रहमान हे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांनी सेवाभाव वृध्दिंगत करावा. सेवा ज्याच्या अंगी तोच खरा माणूस बनू शकतो असे मत अनेक घटना प्रसंगांच्या माध्यमातून प्रतीपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके हे होते त्यांनीही याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते, हीच भावना राष्ट्रनिर्मिती साठी उपयोगी पडेल अशी भावना व्यक्त केले.
या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक करत असताना रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास या थीमसह हे शिबिर ग्राम विकासासाठी मोलाची भूमीका बजावेल असे मत व्यक्त केले. तर ग्रामस्थांच्या वतीने विनायकराव पाटील यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे स्वागत करून गावाच्या विकासासाठी विधायक कार्य घडवून आणू असा आशावाद व्यक्त केला. या शिबिराचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. विश्वनाथ जाधव यांनी केले. या कार्यक्रमातील प्रमूख पाहुण्यांचा परीचय डॉ. विठ्ठल सांडूर यांनी करून दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जाजनूर गावचे सरपंच काशीनाथ गोमसाळे, विनायकराव पाटील, मारोती गोमसाळे, बालाजी गोमसाळे, सोसायटीचे चेअरमन अरविंद माणिकराव पाटील, जाजनूर ग्रामपंचायतीचे सदस्यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शिबिरार्थी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील प्रतीष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबिर २५ ते ३१ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार असून या दरम्यान ग्रामस्थांसाठी उद्बोधनात्मक कार्यक्रम पशू व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
0 Comments