अल फारुख उर्दू विद्यालयत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन
नळेगाव: विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. विद्यार्थ्यात वेज्ञानिक दुर्ष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे. माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श विध्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे या दुर्ष्टी ने अल फारुख उर्दू विद्यालयत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवार (ता.05) पार पडले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्धघाटन मुख्याध्यापक वहाब जागीरदार यांच्या हस्ते करणयत आले. विद्यार्थ्यीमध्ये शक्षणिक आवडीबरोबर विज्ञानाची आवडही निर्माण झाली पाहिजे विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली पाहिजे असे मत प्राथमिक चे मुख्याध्यापक कादीर जागीरदार यांनी व्यक्त केले.शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये 56 प्रयोगाचे सादरीकरण झाले.
यामध्ये उच्च प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा दोन गटामधून प्रयोगाचे सादरीकरण केले गेले. या प्रदर्शनामध्ये परीक्षक म्हणून मुजीब शेख,इरशाद पिरजादे, हुसैन घोरवाडे, यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हशमी मैनोद्दीन यांनी केले. समद शेख यांनी आभार मानले. या कार्यक्रम यशस्वी करणीयासाठी कासीम शेख इस्माईल सय्यद, लायक सॊदागर, बाबू मुंजेवार, खुरैशी साहेबालाल,शेख ईलीयास,युनूस शेख, शिक्षक, पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी ने परीक्षम केले.
0 Comments