मुंबई ट्रॅफीकचे अप्पर पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांच्या हस्ते मराठी अस्मितेचा इशाराच्या संविधान विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई: "मराठी अस्मितेचा इशारा" परिवाराकडून संविधान दिन विशेषांक व कालदर्शिकेचे प्रकाशन आज गुरुवार दिनांक 05 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे निसार तांबोळी{ IPS } अप्पर पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले.
"मराठी अस्मितेचा इशारा" या साप्ताहिकाने संविधान दिन विशेषांक काढून संविधानाचे महत्व विषद केले होते. घटनेची पायमल्ली होणार नाही कारण घटना ही कर्तव्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असे निसार तांबोळी म्हणाले. देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर समाजातील सर्व नागरिकांना सन्मानाने जगता यायला हवे त्यासाठी भारतीय संविधानाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
त्यांना "मराठी अस्मितेचा इशारा" परिवाराकडून भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, बुके आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन निसार तांबोळी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी या प्रकाशन सोहळ्यासाठी जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर, मराठी अस्मिताचा इशाराच्या मुख्य संपादक के. वाय. पटवेकर, कार्यकारी संपादक बी. जी. शेख, उपसंपादक बि.डी. उबाळे, मुंबईचे प्रतिनिधी विशाल कोथिंमिरे आदी उपस्थित होते.
0 Comments