Latest News

6/recent/ticker-posts

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औराद शहाजानी येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औराद शहाजानी येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात


निलंगा: दि. 12 जानेवारी 2023 रोजी राजमाता  जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती चे औचीत्य साधून युनिव्हर्सल पब्लिक स्कूल, औराद शहाजानी मध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांचे प्रदर्शन केले या दिवशी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला घटक चाचणी मध्ये प्रथम आलेले सहावीतील विद्यार्थी आदित्य फुलारी, आदित्य हंगरगे, मेटे समृद्धी, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच भंडारे प्रिया, वाघमारे प्रीती, लामतुरे इशिता, गिरी सोहम, आकडे मधुरा खामकर नम्रता, मेटे समृद्धी या विद्यार्थ्यानी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर भाषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयता सहावीतील विद्यार्थी लासूने सुफियान व बोंडगे अंकिता यांनी केले तसेच विद्या शिंदे, थेटे सारंग, थेटे विष्णू, चिंचोळे रोहित, चंदनकेरे पृथ्वीराज ,वाघदुरे यश ,मरे गायत्री ,घायाळ चांदणी दुर्वे कल्पना ,खर्गे सोनाली, बोरोळे श्रावणी, लातूरे अनुष्का , बिरादार प्रांजली, भंडारे श्रेया ,मुगळे सृष्टी, जाधव प्रतिभा, जाधव मोहिनी, सगरे वैभवी, माळी मयुरी, जोशी सुयोग, तनवी पाटे या सर्व विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य कला सादर या विद्यार्थ्यांना शिक्षका ललिता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ श्रुती कुलकर्णी यांनी केले.

Post a Comment

0 Comments