Latest News

6/recent/ticker-posts

हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा दाखल;तलवार जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा दाखल;तलवार जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर: पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा मधुकर पवार यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पथक तयार करुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे. याचसंबंधाने माहिती काढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक 03/01/2023 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे भादा हद्दीतील अंधोरा गावात एक युवक हातात तलवार घेऊन फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने  सदर पथकाने तात्काळ आंदोरा गावात जाऊन हातात तलवार घेऊन फिरणारा युवक नामे अक्षय सतीश आंबेकर, वय 26 वर्ष, राहणार आंदोरा तालुका औसा जिल्हा लातूर याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लोखंडी तलवार मिळून आली. सदरची तलवार जप्त करण्यात आली असून सदर युवकावर पोलीस ठाणे भादा येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास भादा पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे  यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव सहायक फौजदार, संजय भोसले, पोलीस अमलदार राजेंद्र टेकाळे, राम गवारे, मोहन सुरवसे, प्रकाश भोसले, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments