वर्ल्ड जापनीज शोतोकान कराटे ऑर्गनायझेशनच्या खेळाडूंचे यश
लातूर: महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर च्या अंतर्गत, दि. १२/०१/२०२३ व १३/०१/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या विभागीय कराटे स्पर्धेत वर्ल्ड जापनीज शोतोकान कराटे ऑर्गनायजेशन च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यात प्रगती उद्धव जाधव- प्रथम वयोगट U१४ वजन गट -४६ , प्रथमेश राम जाधव प्रथम वयोगट U१४ वजन गट -२५ यांची महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत निवड झाली आहे. तसेच रोहन विठ्ठल सूर्यवंशी द्वितीय वयोगट U१७ वजन गट -५० , हर्ष नामदेव भोसले द्वितीय वयोगट U१४ वजन गट -५० , आर्यन बब्रुवान सुरवसे द्वितीय वयोगट U१४ वजन गट -३० , शिवदर्शन मुदगळे द्वितीय वयोगट U१४ वजन गट -३५ , रेश्मा ईश्वर सूर्यवंशी त्रतीय वयोगट U१७ वजनगट -५२ यांनीही ह्या स्पर्धेत यश संपादन केले सर्व यशस्वी खेळाडूचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments