अल फारुख उर्दू विद्याल्यात आनंदनगरीत हजारांची उलाढाल
नळेगाव: गावातील अल फारुख उर्दू विद्याल्यात सोमवारी(दि.२३)आनंदनगरी पार पडली. यावेळी ८५ पेक्षा अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल विध्यार्थ्यांनी लावून २८ हजारांची उलाढाल झाल्याची माहिती शाळेने दिली.खरी कमाई या कार्यक्रमाचे उदघाटण शाळेचे अध्यक्ष नजीब जागीरदार यांनी रिबीन फित कापून केले.
विद्यार्थ्याना व्यवहार ज्ञान व्हावे,बाजारातील वस्तुची किमंत कळावी,व्यवसायाची माहिती मिळावी, खरेदी विक्रीचे व्यवहार समजावेत, नफा-तोटा यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच व्यवहारीक संवाद कसे करावेत यासाठी आनंदनगरी (खरी कमाई) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या मध्ये किराणा दुकान,स्टेशनरी,खाद्यपदार्थ
भाज्या,फळे,आदि दुकाने उभारण्यात आली होती. या बाजाराला गावातील सर्व पालक, गावातील नागरिक,आसपासच्या परिसरातील लोकांनी व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षेतर कर्मचारी यांना आनंदनगरीला भेट दिली.
0 Comments