Latest News

6/recent/ticker-posts

चला जाणुया नदीला उपक्रमा अंतर्गत शिरोळ येथे प्रबोधनपर कार्यक्रम

चला जाणुया नदीला उपक्रमा अंतर्गत शिरोळ येथे प्रबोधनपर कार्यक्रम

सलीमखाँ पठाण

शिरोळ: महाराष्ट्र शासन सांस्कृतीक व पर्यटन विभाग,जिल्हा परिषद,लातूर,मानवलोक संस्था,महात्मा बसवेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चला जाणुया नदीला अंतर्गत मांजरा नदी प्रदुषण मुक्त कशी करता येईल यासाठी सारसा येथुन सुरु झालेली जलयात्रा आज शिरोळ येथे आलेली होती. यावेळी उध्दव बापु फड यांचं तुझं गाव आहे तीर्थ यावर व्याख्यान झालं. मांजरा नदी प्रदुषण मुक्त करायची असेल तर महिलांनी आणी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत यावेळी त्यांनी मांडले. प्रास्ताविकात डॉ. संजय गवई यांनी आपल्या गावची नदी हि आपली माता आहे आणी आपणच तिचं पावित्र्य जपलं पाहिजे असे उदगार काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोळचे सरपंच गौतम सुरवसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ, लातुरचे प्रादेशिक आधिकारी परमेश्वर कांबळे आणी मानवलोकचे लालासाहेब आगळे हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, उपसरपंच प्रताप पाटिल, ग्रा.पं.सदस्य सुर्यकांत जाधव, नवाज तांबोळी, तलाठी विष्णु पोचापुरे, ग्रामसेवक माने, कृषी सहाय्यक आराध्ये आणी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेचा सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतीश रावजादे यांनी केले आणी समारोप प्रदुषण महामंडळ प्रादेशिक आधिकारी परमेश्वर कांबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments