Latest News

6/recent/ticker-posts

मोरे वस्ती,चिखलीच्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर- पांडाभाऊ साने

मोरे वस्ती,चिखलीच्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर- पांडाभाऊ साने


मुस्तफा सय्यद

पुणे: चिखली,मोरे वस्तीमधील नागरिकांच्या हितासाठी जे आपल्या हातुन प्रश्न सोडविता येतील त्यासाठी स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने सर्व प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर आहे असे पांडा साने म्हणाले. ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्याना ताम्हाणे वस्ती येथील चिंचेच्या मळ्याकडून पायी शाळेत जाणाऱ्या-येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सोईचा असणारा रस्ता बंद करण्यात आला होता. आ. महेश लांडगे यांच्याशी संवाद साधून तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला असल्याचे पांडाभाऊ साने यांनी सांगितले. पांडाभाऊ साने यांच्या कार्यालयात पालकांनी शाळेच्या वारंवार होणाऱ्या मुजोर कारभाराचा पाढा आमदार महेश लांडगे यांच्या समोर वाचला.

आ. लांडगे यांनी त्या रस्त्यासंदर्भात व शाळेच्या समस्या संदर्भात अधिकारी व मुख्याध्यापक यांच्याशी बोलून या समस्यातुन पालकांना दिलासा दिला. यावेळी मोरेवस्ती परिसरातील समस्या विषयक तक्रारी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संबंधित व्यक्तींना सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments