Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी बेलकुंडचे कोळी

औसा तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी बेलकुंडचे कोळी


बी डी उबाळे

औसा: तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी बेलकुंड ता. औसा येथील सरपंच विष्णू कोळी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते देऊन सरपंच विष्णू कोळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. औसा तालुक्यामध्ये प्रत्येक गावचा विकास करण्यासाठी तालुका स्तरावर आणि ग्रामीण स्तरावरही मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात या अडचणीची शासकीय स्तरावर वाच्यता होऊन ती पूर्णपणे सोडवणूक करण्यासाठी या सरपंच संघटनेचा नक्कीच उपयोग होणार आहे यामुळे औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने ही निवड करण्यात आल्याचे समजते.

बेलकुंड येथील सरपंच विष्णू कोळी यांना औसा तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी काम करण्याची या अनुषंगाने संधी मिळाली असून याचा सदुपयोग करून सरपंचांना विकास काम करताना येणाऱ्या समस्या सोडविणे आवश्यक आहे. या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन औसा तालुक्यांतील भाजप कार्यकर्ते,सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी केले असून भावी काळासाठी त्याच्या हातून तालुक्यात विकास करण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments