जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत भादा कृषी सहाय्यक गव्हाणे यांनी पटकविला दुसरा क्रमांक;तर विविध स्पर्धेत अनेकांनी मारली बाजी
बी डी उबाळे
औसा: महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा ज्यामुळे त्या स्पर्धेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुव्यवस्थेत राखले जाईल आणि कर्मचारी दैनंदिन कामकाजामध्ये जोमाने काम करतील आणि ते खेळाडू वृत्तीने आपले दैनंदिन काम करतील याकरिता महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव लातूर 2022-23 साठी लांब उडी या खेळा मध्ये सहभाग घेऊन कृषी सहाय्यक सुरेखा गव्हाणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यामुळे त्यांना स्मृती चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच औसा तालुक्यातील हॉलीबॉल संघ दिलीप पोद्दार बॅडमिंटन सिंगल व डबल्स मध्ये दिलीप पोद्दार आणि जटाळ,महिला बॅडमिंटन मध्ये गंगथडे, सिंगल मध्ये व डबल्स मध्ये गंगथडे व कातळे आणि लांब उडी मध्ये गव्हाणे स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी औसा तालुक्यातील पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचे व टीमचे अभिनंदन केले जात आहे.
0 Comments